Saturday 25 June 2016

नासाच्या स्पर्धेत भाग घेणार भारतीय टीम

ह्युस्टन : नासाच्या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारतातील विद्यार्थ्यांचा एक गट सहभाग घेत आहे. रिमोट संचलित वाहनांचे डिझाइन आणि वाहने तयार करणे, यावर आधारित ही स्पर्धा आहे. भारताच्या गटात अभियांत्रिकीच्या १३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.मुंबईस्थित मुकेश पटेल स्कूल आॅफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटचा ‘स्क्रू ड्राइवर्स’ नावाचा हा गट विविध देशांतून आलेल्या ४० अन्य गटांसोबत स्पर्धा करील. ह्युस्टनमध्ये गुरुवारीच या स्पर्धेला सुरुवात होत
आहे. यात चीन, स्कॉटलंड, रूस, अमेरिका, कॅनाडा, आयर्लंड, मेक्सिको, नॉर्वे, डेन्मार्क, इजिप्त, तुर्की आणि पोलंड आदी देशांचा सहभाग आहे.या स्पर्धेचे आयोजन एमटीईने (मरीन अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी एज्युकेशन) केले आहे. भारताकडून दाखल झालेला हा एकमेव गट आहे. याचे नेतृत्व प्रोफेसर सावर कुमार नाईक हे करीत आहेत. २३ जून ते २५ जून या काळात नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमधील प्रयोगशाळेत स्पर्धा होत आहेत. नासा या वर्षी नवी मोहीम सुरू करणार आहे. विद्यार्थ्यांना या वर्षी असे मॉडेल तयार करायचे आहे, जे की पाण्याच्या खाली आणि अंतराळातही काम करू शकेल.

No comments:

Post a Comment