Saturday 25 June 2016

चीनमध्ये वादळी पावसाचा कहर

चीनमध्ये वादळी पावसाचा कहर, 98 जणांचा मृत्यू तर 800हून अधिक जखमी
 बिजींग, दि. 24 - पूर्व चीनमध्ये मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळाचा फटका बसल्याने 98 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 800हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पूर्व चीनमधील जिंगासू प्रांतातील यानचेंग शहराला पावसाचा आणि वादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. शहरामधील अनेक घरांचही प्रचंड नुकसान झालं असल्याची माहिती सरकारने दिली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी लवकरात लवकर बचावकार्य पुर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय स्तरावरील आणीबाणी जिंगासू प्रांतात घोषित करण्यात आली आहे. आतापर्यंत 98 लोकांचा मृत्यू झाला असून बचावकार्य सुरु आहे. अजूनही अनेक मृतदेह सापडले नसून त्यांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत.  हवामान खात्याने पुन्हा एकदा पाऊस, वादळ आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 

No comments:

Post a Comment