Saturday 25 June 2016

अखेर ब्रिटन स्वतंत्र

मुंबई : जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा जनमताद्वारे घेतलेला निर्णय म्हणजे ब्रिटनला मिळालेले स्वांतत्र्यच मानले जात आहे. मात्र जनमताचा कौल कळताच जगभरात अर्थकंप झाला.भारतीय शेअर बाजार दणक्यात आपटले, रुपया घसरला आणि सोन्याच्या किमतीत २,000 रुपयांनी वाढ झाली. शेअर बाजार आणि रुपयाच्या पडझडीतून भारतीय अर्थव्यवस्थेलाही काही झटके बसले असले, तरी या घटनेचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम तत्कालिक असून, भविष्याचा विचार करता ही घटना
भारतीय अर्थकारणाच्या पथ्यावर पडणार असल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. शुक्रवारी सकाळी शेअर बाजाराच्या निर्देशांकात एक हजार अंशांचा गडगडाट झाला आणि गुंतवणूकदारांचे १.७९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
14.ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा राजीनामा
लंडन, दि. 24 - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देणार असल्याचे शुक्रवारी सकाळी जाहीर केले. सार्वमतामध्ये ब्रिटिश जनतेने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर देशाला उद्देशून कॅमेरून यांनी भाषण केले. ब्रिटनने युरोपीय महासंघात रहावे या मताचे असलेल्या कॅमेरून यांनी नैतिक पराजय मान्य करत राजीनामा देण्याची घोषणा केली तसेच जनमताचा आदर करत युरोपीय महासंघातून वेगळे होण्याच्या दृष्टीने वाटचाल केली जाईल याची हमी दिली.
कॅमेरून हे तीन महिने पंतप्रधानपदी राहतिल आणि त्यानंतर पायउतार होतील. या काळात ब्रिटनच्या भावी पंतप्रधानाचा निर्णय केला जाईल.

No comments:

Post a Comment