Saturday 9 July 2016

.उत्तर कोरियाची बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्र चाचणी

उत्तर कोरियाने आज पाणबुडीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. पण, ती अयशस्वी झाल्याचा दावा दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांनी केला आहे. त्तर कोरियाने पूर्वेकडील सिनपो किनाऱ्यावर आज सकाळी 11.30 वाजता या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाने पाणबुडीवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे शेजारील राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरिया अण्वस्त्रे बनविण्याच्या तयारीत आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बनवण्‍यास संयुक्त राष्ट्र संघाने प्रस्‍ताव ठेवला आहे. तरीदेखील उत्तर कोरियाने नियमांची पायमल्‍ली करत क्षेपणास्‍त्र चाचणी घेतली आहे.

उ. कोरियासाठी अमेरिकेची द. कोरियात मिसाईल

अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांना उत्तर कोरियाकडून असलेल्या हल्ल्याचा धोका लक्षात घेत अमेरिकेने दक्षिण कोरियात अत्याधुनिक मीसाईल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती पेंटागॉनने गुरुवारी रात्री दिले आहे. या माहितीनुसार टर्मिनल हाई ऐटिट्यूड एरिया डिफेंस(थाड) मिसाईल तैनात करण्याचा निर्णय अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी एकत्रितपणे घेतला आहे. अमेरिकेने हा निर्णय या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात घेतला होता. याचे मुख्य कारण उत्तर कोरियाने घेतलेली  चौथी अण्विक चाचणी होती.  'थाड' मिसाईलचा निर्णय लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. उत्तर कोरियाला हे एका प्रकारचे चोख उत्तर असून यामुळे दोन्ही देशांच्या सुरक्षितेत वाढ होईल. 

चीनच्या लष्करात महाकाय विमान

आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनने ‘वाय-२०’ नावाच्या विमानाची निर्मिती केली असून हे विमान चीनच्या वायू दलात बुधवारी सहभागी झाले आहे. लष्करी वाहतुकीसाठी या विमानाचा वापर केला जाणार असून जगातील अशा प्रकारचे लष्करी वाहतुकीसाठीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान असल्याचे सांगितले जात आहे. या विमानाचे टेक ऑफ वजन क्षमता ही तब्बल २०० टन इतके आहे. २०० टन वजनासह ४,५०० किलोमीटर इतका प्रवास हे विमान करू शकते. तर वजन जर ४० टन कमी केले तर हे विमान ८००० किलोमीटर इतका प्रवास करू शकते. लष्कर जगात आज सर्वात मोठे लष्कर समजले जाते. इतक्या मोठ्या लष्कराच्या दळवळणासाठी हवाई दलात वापरायची विमाने ही मोठी असणे चीनसाठी आवश्यक असल्याने या विमानाची निर्मिती केली जात आहे. 

ंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिका दौर्‍यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री दक्षिण आफ्रिकेत पोहाचले. नरेंद्र मोदी सध्‍या चार आफ्रिकी देशांच्‍या दौर्‍यावर आहेत. नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेत पोहोचताच आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार मंत्री आणि लघुद्योग मंत्री यांनी त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात आले. त्‍यानंतर मोदी यांनी राष्‍ट्रपती जकैब जुमा यांची भेट घेतली.भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्‍यामध्‍ये आर्थिक संबंध आणखी दृढ होण्‍यासाठी हा दौरा महत्त्‍वपूर्ण आहे.विदेश मंत्रालयाचे

.भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान करार

संरक्षण, व्यापार, उत्पादन, खाण आणि खनिज आदी क्षेत्रात भागीदारी करण्याबाबत भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जॅकब झुमा यांनी या करारांवर स्वाक्षरी केली. महात्मा  गांधीजी यांनी दक्षिण आफ्रिकेत दिलेल्या वंशभेदविरोधी लढ्याला उजाळा देत उभय नेत्यांनी दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत करण्याचा निर्धार केला.पंतप्रधान मोदी आफ्रिकन देशांच्या दौर्‍यावर आहेत. मोदी यांनी शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेला भेट दिली. राष्ट्राध्यक्ष झुमा यांनी मोदी यांचे स्वागत केले. दहशतवादी कारवायांनी लोकांचे जीवन धोक्यात आल्याने दहशतवादविरोधी लढ्यात एकत्रित काम करण्याचा निर्धारही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.  संरक्षण, सागरी सुरक्षा, खाण, खनिज क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 

मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून अधिकृत दोन नावांची घोषणा

 मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सामील होणार की नाही या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन राज्यमंत्री पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.शिवसेनेने दोन राज्यमंत्रीपदावर समाधान मानले असून अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले आहे. दरम्यान, शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार नसून दोन राज्यमंत्रीपद पदांवर भाजपने त्यांची बोळवण केल्याचे समजते. तसेच, कॅबिनेट मंत्रीपदासंदर्भात शिवसेनेने तडजोड करून एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खाते देण्यावर मान्य केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

शिवसेनेला गृहराज्य मंत्रीपद, मंत्रिमंडळ विस्तारासोबत खाते बदल

मुंबई : राज्यमंत्र्यांच्या अधिकारात वाढ करण्यात येणार असून शिवसेनेला एक गृहराज्य मंत्रीपद देण्यात आले आहे. याबाबत शिवसेना-भाजपने संयुक्तिक प्रसिद्ध पत्रक काढले आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारासोबत खाते बदलही करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.सामन्यात सुरुवातीपासूनच उभय खेळाडूंनी आक्रमक खेळ करताना तोडीची झुंज दिली. पहिला सेट जिंकणाऱ्या रावनिकला फेडररने दुसऱ्या व तिसऱ्या सेटमध्ये संधी दिली नाही. चौथ्या सेटमध्येही फेडरला रावनिकची सर्व्हिस मोडून काढत आघाडी घेण्याची संधी होती; पण रावनिकने वेळीच सावरत पिछाडी भरून काढत सर्व्हिस राखली. त्यानंतर मात्र त्याने फेडररला फारशी संधी दिली नाही.

.अँडी मरे फायनलमध्ये

लंडन, दि.८ -  विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या द्वितीय मानांकित अँडी मरे याने झेक रिपब्लिकच्या दहाव्या मानांकित टॉमस बेर्डिच याचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटसमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठली.अँडी मरे याने हा सामना १ तास ५७ मिनिटांत जिंकला. आता त्याची विजेतेपदाच्या लढतीसाठी कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी गाठ पडेल.

कोच कुंबळेंच्या सेकंड ‘इनिंग्ज’ला प्रारंभ

बासेटेरे : भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्याचा प्रारंभ आज, शनिवारपासून विंडीज बोर्ड एकादशविरुद्धच्या दोन दिवसांच्या सामन्याद्वारे करणार आहे. मुख्य कोच अनिल कुंबळे यांच्या नव्या इनिंग्जला ४९ दिवसांच्या दौऱ्याने सुरुवात होत असून, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा फिटनेस, तसेच फलंदाजांचा फॉर्म तपासून पाहण्याचा प्रयत्न ते करणार आहेत.विंडीज बोर्ड एकादश संघात कसोटी संघातील सहा खेळाडूंचा भरणा असून,

मानवतेसाठी झटणारे ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधींचे कराचीत निधन

कराची, दि. ९ - पंधरा वर्षांपूर्वी अपघाताने सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय गीताचा पोटच्या मुलीप्रमाणे जपणारे व तिच्यासह अशा अनेक अश्राप जीवांचा सांभाळ करणारे पाकिस्तानमधील ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधी यांचे निधन झाले. 'केवळ मानवतेसाठी' झटणारी व्यक्ती अशी ओळख असणा-या ईधी यांनी वयाच्या ८८व्या वर्षी कराचीतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या विकाराने आजारी असलेल्या ईधी यांच्यावर कराचीतील मेडिकलमध्ये उपचार सुरू

काश्मीरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती, अमरनाथ यात्रा तूर्तास स्थगित

श्रीनगर, दि. ९ - काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करून हिजबुल मुजाहिद्दीनच्या म्होरक्यासह तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर खो-यात तणावाचे आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बुरहान वानी हा काल रात्री जवानांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आणि फुटीरतवाद्यांनी बंद पुकारला. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अमरनाथ यात्राही तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना नजरकैदेत ठेवले आहे. तसेच खो-यातील इंटनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. ('हिजबुल'च्या कमांडरसह ३ अतिरेक्यांचा खात्मा)काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि पोलिसाच झालेल्या चकमकीत बुरहानला लष्काराने यमसदनी पाठवले आहे. दीर्घ काळ चाललेल्या या चकमकीत बुरहानसोबत तिघा दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले आहे. स्वतःचा आणि आपल्या साथीदारांचा फोटो सोशल मीडियावर टाकणारा बुरहान हा पहिला (कमांडर) दहशतवादी होता. बुरहानसोबत ज्या दहशतवाद्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यांचा वेगवेगळ्या चकमकीत मृत्यू झाला आहे. बुरहानचा खात्मा हा सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने मोठं यश मानलं जात आहे. 

फेडेक्स पराभूत

जागतिक रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या नोव्हाक जोकोविचने झटपट गाशा गुंडाळल्याने रॉजर फेडररला यंदा विम्बल्डन जेतेपदाची संधी आहे, असे म्हणणाऱ्या त्याच्या पाठिराख्यांचा हिरमोड झाला आहे. शुक्रवारी ऑल इंग्लंड क्लबवरील सेंटर कोर्टवर पार पडलेल्या उपांत्य झुंजीत कॅनडाच्या मिलॉस रावनिकने स्वित्झर्लंडच्या माजी विजेत्या रॉजर फेडररवर ६-३, ६-७ (३-७), ४-६, ७-५, ६-३ असा विजय मिळवून विम्बल्डनच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तब्बल तीन तास २५ मिनिटे रंगलेल्या या लढतीत ३४ वर्षांच्या फेडररने २५ वर्षांच्या मिलॉस रावनिकला कडवी झुंज दिली हे विशेष; पण रावनिकची ताकद काही अंशी सरस ठरली आणि फेडरर मागे पडला.

मुम्बा अव्वल क्रमांकावर

अनुभव आणि कौशल्यपूर्ण खेळ या जोरावर सामना एकहाती खेचून आणण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, हे अनुपकुमारने शुक्रवारीदेखील दाखवून दिले. रिशांक देवाडिगासारखा चढाईपटू व जीवाकुमारसारखा बचावातील मोहरा अपयशी ठरूनही यू मुम्बाने शुक्रवारी प्रो कबड्डी लीगमधील झुंजीत पिछाडी भरून काढत बेंगळुरू बुल्सवर २४-२३ असा निसटता विजय मिळवला. यू मुम्बाने या विजयासह अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.

टीम इंडियाच्या ‘कसोटी’चा काळ

वर्षभरात होणाऱ्या १७ कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जय्यत तयारी सुरू असून कर्णधार विराट कोहलीने आगामी काळ हा भारतीय क्रिकेट संघाच्या जडणघडणीचा काळ असल्याचे म्हटले आहे. हा काळ भारतीय खेळाडू एक कसोटी संघ म्हणून कसे वाटचाल करतात याचा निदर्शक असेल, असे कोहलीला वाटते. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने आपल्या आगामी आव्हानांबद्दल टिप्पणी केली.अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी झालेल्या निवडीचेही

परदेशी क्रिकेट संघांची बांगलादेशवर फुली

बांगलादेशची राजधानी ढाक्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानप्रमाणेच परदेशी संघ क्रिकेट खेळण्यासाठी बांगलादेशात जाण्यास नकार देतील, अशी भीती आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे (आयसीसी) माजी अध्यक्ष एहसान मानी यांनी व्यक्त केली आहे.ढाक्यात दहशतवाद्यांनी २० परदेशी नागरिकांना ठार मारल्यामुळे भविष्यात परदेशी क्रिकेट संघ बांगलादेशात खेळण्यास पाकिस्तानप्रमाणेच नकार देतील अशी शक्यता मानी यांनी व्यक्त केली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये इंग्लंडचा संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर या दहशतवादी घटनेचे सावट असेल.मानी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, ढाक्यात घडलेल्या या घटनेनंतर पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशलाही परदेशी क्रिकेट संघांचे मन वळविण्यात अडचणी येणार आहेत. गेल्या काही वर्षांत बांगलादेशातील दहशतवादी घटनांमुळे बांगलादेश क्रिकेटला मोठा धक्का बसू शकेल. एकूणच आगामी दौऱ्यासाठी इंग्लिश संघाचे मन वळविणे बांगलादेशला सोपे जाणार नाही.मानी म्हणाले की, बांगलादेशातील दहशतवादी घटनेनंतरही जर बांगलादेश क्रिकेट बोर्ड परदेशी क्रिकेट संघांनी तेथे खेळावे म्हणून त्यांचे मन वळविण्यात यशस्वी ठरले तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल. कारण २००९मध्ये श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान परदेशी क्रिकेट संघांचे मन वळविण्यात यशस्वी ठरलेले नाही.

भारताची आजपासून पूर्वपरीक्षा

भारताचे नूतन प्रशिक्षक अनिल कुंबळे सध्या तेज गोलंदाज मोहम्मद शमी आणि सलामीवीर शिक्षर धवन यांच्यावर कटाक्ष ठेवून आहेत. आज, शनिवारपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाच्या सराव सामन्याला सुरुवात होत असून शमीचा फिटनेस आणि शिखर धवनचा सूर यावर कुंबळेचे खास लक्ष असेल.वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षिय संघासह भारत दोन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. या

द. आफ्रिकेनं मोहनदासना महात्मा बनवलं!

दक्षिण आफ्रिका ही सत्याग्रहाची जन्मभूमी आहे. याच जागेने मोहनदास यांचे महात्म्यात रूपांतर घडवले. त्यामुळे दक्षिण आफ्रिका हा महात्मा गांधींच्या अगदी हृदयाजवळचा विषय होता,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नरेंद्र मोदी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आफ्रिकेतील भारतीय समुदायाशी जोहान्सबर्गमधील कार्यक्रमात संवाद साधला.जुलै १९१४मध्ये या देशाचा निरोप घेताना ही पवित्र भूमी आपल्याला मातृभूमीसमान असल्याचे गांधीजी म्हणाले असल्याचीही आठवण त्यांनी करून दिली.

झाकीर नाईकांविरोधातील अहवाल यूपीएने दाबला

ढाक्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या डॉ. झाकीर नाईक यांच्याविरोधात आपण २००८ मध्येच अहवाल तयार केला होता, पण तेव्हाच्या केंद्र आणि राज्य सरकारने तो दाबून टाकला, असा गौप्यस्फोट माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे भाजप खासदार सत्यपाल सिंह यांनी केला आहे. त्यावेळीच, पोलिसांच्या अहवालाची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली असती, तर बऱ्याच गोष्टी टळल्या असत्या, असं नमूद करत त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.ढाक्यातील सात दहशतवाद्यांपैकी दोघे इस्लामिक

Friday 8 July 2016

Uma Bharti launches Namami Gange projects worth Rs 250 crore in Uttarakhand


HARIDWAR: Holding that "wrong planning" led to the pollution in Ganga, Union minister Uma Bharti today launched 43 projects worth Rs 250 crore under Namami Gange programme in Uttarakhand, saying that the Modi government is taking corrective steps to cleanse the river. "The Ganga has not been polluted because of untreated water as much as because of wrong planning. Projects being launched under Namami Gange are corrective steps to atone for what has been done over the years to dirty  .. 

Strategic divestment in PSUs within 6 months: Arvind Panagariya

Government is expected to go ahead with the strategic divestment in public sector units (PSUs) within the next six months besides closing down sick firms that are beyond revival, NITI Aayog Vice Chairman Arvind Panagariya said. 
"On strategic divestment, you will see action in the next six months I would say, meaning that the process is on, but you will see some action happening in the next six months or less," Panagariya said. 



केजरीवाल सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

नवी दिल्ली- केंद्र आणि राज्य यांच्या अधिकाराच्या वादाबाबत केजरीवाल सरकारला आज सर्वोच्च न्यायालयाने जोराचा धक्का देत याप्रकरणाच्या सुनावणीस नकार दिला. या प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयात झाली असून त्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तो निकाल येईपर्यंत आपण सुनावणी करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सध्या हा वाद दिल्ली उच्च न्यायालयात असून त्यांनी तो पूर्णपणे ऐकून घेतला आहे. त्याचप्रमाणे त्याबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तुम्ही सर्वोच्च न्यायालयात येऊ शकता, असे खडे बोल न्यायमूर्ती दीपक कपूर आणि न्यायमूर्ती यू.यू. ललित यांनी दिल्ली सरकारला सुनावले. दिल्ली उच्च न्यायालय हे "घटनात्मक न्यायालय‘ असून त्याला या प्रकारच्या घटनात्मक प्रकरणात निर्णय देण्याचा अधिकार आहे, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारची याचिका फेटाळून लावली. दिल्ली केंद्र शासित प्रदेश असून त्याला घटनेने दिलेल्या अधिकाराने काम करू द्यावे, अशी मागणी करीत दिल्ली सरकारच्यावतीने वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सर्वोच्च्य न्यायालयात याचिका दाखल केली होती. जयसिंग म्हणाल्या की, दिल्लीतील सरकार हे निवडून आलेले सरकार आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने उपराज्यपालांनी काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा वादाचा विषय सर्वोच्च न्यायालयाने प्रथम विचारात घ्यावा. त्यावेळी खंडपीठाने सरकारला सुनावत आपण प्रथम घटनेच्या कलम 226 प्रमाणे उच्च न्यायालयात गेलात त्यांनी आपला निकाल राखून ठेवला आहे. प्रत्येक न्यायालयाला आपले अधिकार क्षेत्र असते आणि उच्च न्यायालय चांगले काम करीत आहे, असे म्हणत खंडपीठाने केजरीवाल सरकारचे कान उपटले. 

युरो चषक - फ्रान्स अंतिम फेरीत

मार्सेले : युरो चषक २0१६ फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रिजमनने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर फ्रान्सने जगज्जेत्या जर्मनीला २-0 गोलने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. २000 नंतर पहिल्यांदाच फ्रान्स युरो चषकाच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. सुरवातीची दहा मिनिटे यजमान फ्रान्सने दबदबा निर्माण केला, परंतु त्यानंतर रंगात आलेल्या जर्मनीने फ्रान्सच्या गोलपोस्टवर धडाधड आक्रमणे केली. चेंडू सतत फ्रान्सच्या गोलक्षेत्रात फिरत होता. सामन्यात चेंडूचे पझेशन जर्मनीकडे ६५ टक्के तर फ्रान्सकडे ३५ टक्के इतके होते. सामन्यात वर्चस्व जर्मनीचे असले तरी पुर्वार्ध संपता संपता फ्रान्सचे नशीब फळफळले. ग्रिजमनच्या कॉर्नरला हेडद्वारे ब्लॉक करताना जर्मनीचा कर्णधार श्वाईनटायगरचा हात चेंडूला लागला आणि पंचांनी फ्रान्सला पेनाल्टी बहाल केली. ग्रिजमनने या पेनाल्टीचे सोने केले. त्याने चेंडूला उजव्या कोपऱ्यातून गोलजाळीत धाडून फ्रान्सला १-0 असे आघाडीवर नेले.उत्तरार्धात खेळ संथ होत आहे असे वाटत असतानाच पोग्बाच्या ग्रिजमनने ७२ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. मैदानाच्या डाव्या कोपऱ्यात पोग्बाने पदलालित्याचा उत्कृष्ट नमुना दाखवत जर्मन खेळाडूला झुलवत गोलपोस्टच्या दिशेन फटका खेळला. हा चेंडू जर्मन गोलकिपर नेयुरने मोठ्या शिताफीने परतवला खरा, पण पुढे उभ्या असलेल्या ग्रिजमनने सहजपणे त्याला गोलजाळीची दिशा दाखवली. २-0 अशी आघाडी मिळाल्यामुळे स्टेडीयममध्ये उपस्थित यजमान संघाच्या चाहत्यांमध्ये उत्साह पसरला तर खेळाडूंमध्ये चैतन्य संचारले.पिछाडीवर पडलेल्या जर्मन संघाने यानंतर आक्रमणाचा जोर वाढवला. मुलर, ओझील, गोत्झे यांनी अनेक चढाया केल्या, परंतु त्यांना गोल नोंदवण्यात अपयश आले. फ्रान्सचा गोलरक्षक हुगो लोरिसने चपळाईने ही आक्रमणे परतावून लावली. शेवटी ही लढत २-0 अशी जिंकून फ्रान्सने अंतिम फेरी गाठली. 

सौदी अरेबियातल्या हल्ल्यांप्रकरणी 12 पाकिस्तानींना अटक

सोमवारी मदिना येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्याप्रकरणी 12 पाकिस्तानी नागरिकांसह 19 जणांना अटक करण्यात आल्याचे सौदी अरेबियाच्या सरकारने जाहीर केले आहे. शियांच्या मशिदीजवळ करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये एकूण सात जण ठार तर 2 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. नईर मोस्लेम हम्माद अल बलावी हा सौदी नागरिक या हल्ल्यांमागचा सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा हल्ला तिघा दहशतवाद्यांनी केला होता. जेद्दाह मध्ये झालेला हल्ला अब्दुल्ला कलझर खान या पाकिस्तानी व्यक्तिने केल्याचे तपासात आढळले आहे. ड्रायव्हर असलेला अब्दुल्ला गेली 12 वर्षे सौदीमध्ये आहे. मदिना येथे झालेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले होते. तर कातिफमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये तीन जण ठार झाले होते. या हल्ल्यांची अद्याप कुठल्याही दहशतवादी गटाने जबाबदारी घेतलेली नाही. मुस्लीमांसाठी दुसऱ्या क्रमांकाचं पवित्र स्थान असलेल्या मदिनामध्ये प्रथमच आत्मघातकी दहशतवादी हल्ला झाला आहे. प्रेषित मोहम्मद यांनी बांधलेली मशिद या ठिकाणी असून या स्थळांची संरक्षणाची जबाबदारी आपली असल्याचे राज्यकर्ते सौद घराणे मानते. तर, इस्लामिक स्टेटने सौद घराणे धर्मभ्रष्ट असून त्यांची राजवट उलथून टाकण्याची घोषणा केली आहे. सौदी अरेबियावर हल्ले करण्याचे आदेश इसिसचा नेता अबू बकर अल बगदादी याने दिले असून त्यानंतर हे हल्ले झाले आहेत. सौदीमधले तरूण कट्टरतावादाकडे झुकत असून याबाबत सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी चिंता व्यक्त केली आहे.

राज्यमंत्रिपदांवरच सेनेची बोळवण!

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान न मिळालेल्या शिवसेनेला राज्य मंत्रिमंडळ विस्तारातही केवळ दोन राज्यमंत्रिपदांवर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद वाढवून मिळावे, अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून केली, पण मंत्रिपदाबाबत आधीच सूत्र ठरलेले असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद देण्यास नकार दिला. सदाभाऊ खोत व महादेव जानकर हे मित्रपक्षाचे दोघेही राज्यमंत्री असतील.मुख्यमंत्र्यांकडून नकार येताच नरमाईची भूमिका घेत ‘शिवसेना उद्याच्या विस्तारात सहभागी होईल आणि आमचे दोन नेते मंत्री होतील’, असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रात्री जाहीर केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील २१ महिन्यांच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार शुक्रवारी सकाळी ९ वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. त्यात भाजपाचे सहा, शिवसेनेचे दोन आणि मित्रपक्षांचे दोन, असे दहा मंत्री असतील. संभाव्य मंत्र्यांमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर, सोलापूर ग्रामीणचे आमदार सुभाष देशमुख, निलंग्याचे (जि. लातूर) संभाजी पाटील निलंगेकर, सिंदखेडाचे (जि. धुळे) जयकुमार रावल, यवतमाळचे मदन येरावार आणि डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण या भाजपा विधानसभा सदस्यांचा समावेश असेल. शिवसेनेकडून जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील व जालनाचे आमदार अर्जून खोतकर यांना संधी मिळणार आहे. तर मित्रपक्षांपैकी राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना स्थान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसाठी सर्वाधिक डोकेदुखी ठरलेल्या बुलडाणा जिल्ह्यातून शेवटी भाऊसाहेब फुंडकर यांचा नंबर लागला आहे. तेथे सातत्याने विधानसभेत निवडून येत असलेले मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती आणि जळगाव जामोदचे आमदार डॉ.संजय कुटे यांची संधी हुकली आहे. सुभाष देशमुख यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्याला दुसरे मंत्रीपद मिळत आहे. याच जिल्ह्यातील विजय देशमुख हे सध्या राज्यमंत्री आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'त्या' ऐतिहासिक उडीला आज १०६ वर्ष पूर्ण

 भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी इंग्रजांचा अत्यंत जुलमी छळ सहन करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 'मोरिया' बोटीतून मारलेल्या त्या ऐतिहासिक उडीला आज १०६ वर्ष पूर्ण झाली. आजच्याच दिवशी आठ जुलै १९१० रोजी सावरकरांनी 'मार्सेलिस' बंदरात थांबलेल्या 'मोरिया' बोटीतून उडी मारुन फ्रान्सचा किनारा गाठला होता. 
 १९०९ साली मॉरली-मिनटो सुधारणां विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सशस्त्र उठाव केला होता. या प्रकरणी ब्रिटीशांनी सावरकरांवर गुन्ह्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला. या प्रकरणी त्यांना लंडनमध्ये अटक झाली. इंग्रजांनी त्यांना मार्चमहिन्यात अटक केली. एक जुलै १९१० रोजी सावरकरांना मोरिया बोटीतून भारतात पाठवण्यात आले. 
 त्यावेळी इंग्रजांच्या तावडीतून कसे निसटायचे हा एकच विचार त्यांच्या डोक्यात होता. आपल्याला बोटीतून पाठवण्यात येईल याची पूर्ण कल्पना त्यांना होती. त्यामुळे त्यांनी आपल्या जवळच्या मित्राला त्यांना ज्या सागरी मार्गाने नेण्यात येणार त्यावर लक्ष ठेवायला सांगितले होते. अखेर आठ जुलैला सावरकरांना ती संधी मिळाली. 
 त्यांनी बोटीच्या शौचकूपाच्या खिडकीतून उडी मारुन फ्रान्सचा किनारा गाठला. त्या एवढयाशा खिडकीतून निसटताना सावरकरांच्या शरीरावर अनेक ओरखडे उठले, खरचटले, जखमा झाल्या. पण स्वातंत्र्यप्राप्तीच्या लक्ष्यासमोर त्यांनी कसलीही परवा केली नाही. अथांग सागर पोहून त्यांनी किनारा गाठला पण किना-यावर फ्रान्स पोलिसांनी पुन्हा त्यांना अटक केली.

केरळमध्ये तृतीपंथीयांना मिळणार पेन्शन



केरळमधले पिनाराई विजयन सरकार शुक्रवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे अर्थमंत्री टीएम. थॉमस यांनी ६० वर्षावरील तृतीयपंथीयांसाठी पेन्शन योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे. यावर्षीपासून केरळमधील ६० वर्षावरील तृतीयपंथीयांना पेन्शन मिळणार आहे. 
 केरळमध्ये डाव्या आघाडीच्या नेतृत्वाखाली एलडीएफ सरकार सर्वांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यास कटिबद्ध आहे. त्यात तृतीयपंथीयांचाही समावेश होतो. आम्ही तृतीयपंथीयांसाठी पेन्शन योजना सुरु करणार आहोत असे थॉमस यांनी सांगितले. विधानसभेतील सदस्यांनी टाळया वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. 
 केरळमध्ये तृतीयपंथीयांची स्थिती अत्यंत वाईट असून, त्यांना रोजच्या जगण्यासाठी शरीरविक्रीय करावा लागत आहे. यासंबंधीच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर  कोची मेट्रो रेल लिमिटेडने पुढे येऊन हाऊसकिपिंग, ग्राहक तक्रार निवारण अशा क्षेत्रांमध्ये त्यांना नोक-यांची संधी दिली. या निर्णयामुळे जवळपास २५ हजार तृतीयपंथीयांना दिलासा मिळाला आहे. 

Wednesday 6 July 2016

अदानीच्या प्रकल्पाला ऑस्ट्रेलियात मंजुरी मेलबर्न : अदानी समूहाच्या ऑस्ट्रेलियातील 21.7 अब्ज डॉलरच्या कोळसा खाणकाम प्रकल्पाला अखेर तेथील पारंपरिक मालकांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मूलनिवासी गटांचे या प्रकल्पासाठी संपुर्ण साह्य असल्याचे सूचित होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वॅंगन अँड जगालिंगो (डब्लू ऍण्ड जे) गटाने शनिवारी कंपनीसोबत झालेल्या बैठकीत बहुमताने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. संपूर्ण समुदायाला, त्यांच्या मुलांना आणि नातवंडाना भविष्यात मिळणाऱ्या संधी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय दिल्याचे कंपनीने म्हटले आहे. परंतु डब्लू ऍण्ड जे समुदायाच्या प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी ही बैठक ढोंगी असून कंपनीने पैसे देऊन घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तसेच या बनावट कराराला न्यायालयात आव्हान देण्याची त्यांनी घोषणा केली आहे. अदानी समूह ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे कारमायकेल हा जगातील सर्वांत मोठा खाण प्रकल्प सुरू करीत आहे. या प्रकल्पाला सुरवातीला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. हा विरोध मावळल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ऑस्ट्रेलिया सरकारने या प्रकल्पाला पुन्हा मंजुरी दिली होती. आता पारंपरिक मालकांनी प्रकल्पाला मंजुरी दिल्याने कंपनीला दिलासा मिळाला आहे. 60 17 प्रतिक्रिया शशांक - रविवार, 17 एप्रिल 2016 - 11:11 PM IST भारतीय उद्योगपती परदेशात जाउन उद्योगधंदे सुरु करताहेत, याचा निषेध करायला ४६ वर्षांचा युवराज आता धावून येईल, कन्हैया पासून थोडा वेळ मिळाला तर मिडिया हि त्याचे कव्हरेज करेल. कारण भारतीयांचा विकास, दबदबा आणि उत्कर्ष व्हावा असे या लोकांना वाटत नाही. त्यांना फक्त गरीब हवेत, मते देण्यासाठी आणि कायम गरीब राहण्यासाठी ! 1 1 राव - रविवार, 17 एप्रिल 2016 - 08:28 PM IST मोदी इफेक्ट. 1 0 अनंत थोरात - रविवार, 17 एप्रिल 2016 - 07:55 PM IST परदेशात जाऊन आपले उद्योगपती हजारो कोटींचे व्यायासाय उभे करतात याचा अभिमान वाटला पाहिजे. सतत अदानी अंबानी यांच्या नावाने बोंबा मारायच्या हे धंदे राजपुत्रावर सोडून द्या, त्याची लायकीच तेवढी आहे,कारण उद्योगांचे महत्व या लोकांना कधीच कळले नाही. खरेतर प्रत्येकानेच अदानी अंबानी बनण्याचे स्वप्न पहिले पाहिजे. 5 3 दुरुगकर अनिल - रविवार, 17 एप्रिल 2016 - 05:15 PM IST चांगली बातमी आहे. आता त्या मुळे भारतात चांगला दर्जा असलेला कोळसा येईल व खाण कामामुळे येथे जे प्रदूषण होईल ते कमी होण्यास मदत होईल. भारताच्या दृष्टीने एक चांगली बातमी आहे. एक भारतीय परदेशात जाऊन आपले पाय तेथे भक्कम करीत आहे. या बातमीकडे एका चांगल्या नजरेने पहा. काळा चष्मा लावून पाहू नका. 7 0 शिवराम गोपाळ वैद्य - रविवार, 17 एप्रिल 2016 - 01:12 PM IST परंतु डब्लू ऍण्ड जे समुदायाच्या प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी ही बैठक ढोंगी असून कंपनीने पैसे देऊन घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तसेच या बनावट कराराला न्यायालयात आव्हान देण्याची त्यांनी घोषणा केली आहे. राष्ट्रद्रोही आहेत हे सदस्य त्यांना पाकिस्तानात पाठवून दिले पाहिजे . 9 5 भारतीय - रविवार, 17 एप्रिल 2016 - 12:49 PM IST बातमीत लिहिले आहे - परंतु डब्लू ऍण्ड जे समुदायाच्या प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी ही बैठक ढोंगी असून कंपनीने पैसे देऊन घडवून आणल्याचा आरोप केला आहे. पण मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. परकीयांनी आमचा देश लुटला, साधनसंपत्ती लुटली तेव्हा कुठे गेली होती त्यांची नैतिकता? आता आमची वेळ आलीय तुम्हाला लुटायची. 13 4 नवी प्रतिक्रिया द्या तुमचे नाव * ई-मेल * Notify me once my comment is published प्रतिक्रिया * (Press Ctrl+g to toggle between English and Marathi) 1000 अक्षरांची मर्यादा,1000 अक्षरे शिल्लक

मेलबर्न : अदानी समूहाच्या ऑस्ट्रेलियातील 21.7 अब्ज डॉलरच्या कोळसा खाणकाम प्रकल्पाला अखेर तेथील पारंपरिक मालकांची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मूलनिवासी गटांचे या प्रकल्पासाठी संपुर्ण साह्य असल्याचे सूचित होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. वॅंगन अँड जगालिंगो (डब्लू ऍण्ड जे) गटाने शनिवारी कंपनीसोबत झालेल्या बैठकीत बहुमताने या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. संपूर्ण समुदायाला, त्यांच्या मुलांना आणि नातवंडाना भविष्यात मिळणाऱ्या संधी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय दिल्याचे कंपनीने म्हटले आहे.
परंतु डब्लू ऍण्ड जे समुदायाच्या प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या सदस्यांनी ही बैठक ढोंगी असून कंपनीने पैसे देऊन घडवून आणल्याचा आरोप केला आहे. तसेच या बनावट कराराला न्यायालयात आव्हान देण्याची त्यांनी घोषणा केली आहे. अदानी समूह ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे कारमायकेल हा जगातील सर्वांत मोठा खाण प्रकल्प सुरू करीत आहे. या प्रकल्पाला सुरवातीला पर्यावरणवाद्यांचा विरोध होता. हा विरोध मावळल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ऑस्ट्रेलिया सरकारने या प्रकल्पाला पुन्हा मंजुरी दिली होती. आता पारंपरिक मालकांनी प्रकल्पाला मंजुरी दिल्याने कंपनीला दिलासा मिळाला आहे.

 

लोकसभा, विधानसभा निवडणूक एकाचवेळी?

मेलबोर्न - लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकाचवेळी घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने दर्शविली आहे. याबाबत बऱ्याच राजकीय पक्षांमध्ये मतैक्‍य असून, यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल, असे मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी म्हटले आहे. तशी शिफारस देखील त्यांनी कायदा मंत्रालयाकडे केली आहे. दोन्ही निवडणुका एकाचवेळी घेण्यापूर्वी पुरेशी तयारी करावी लागेल, अतिरिक्त इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांची सोय करताना मतदानाच्या तारखांचा ताळमेळ साधावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले. ते येथे आयोजित एका आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये बोलत होते.

संसदीय समितीकडे आम्ही तसा प्रस्ताव सादर केला असून समितीनेही यावर राजकीय पक्षांमध्ये आणखी चर्चा होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. या प्रक्रियेमध्ये काही राज्यांना मागे ठेवावे लागेल तर काही राज्यांत आधी निवडणुका घ्याव्या लागतील. दरम्यान, ज्या पक्षांनी या दोन्ही निवडणुका सोबत घेण्याची तयारी दर्शविली आहे, त्यांची नावे मात्र आयोगाने अद्याप जाहीर केलेली नाहीत.
ऑस्ट्रेलियन पद्धत
ऑस्ट्रेलियन निवडणूक पद्धतीमधील साधेपणा, पारदर्शकता आणि येथील विविध राजकीय पक्षांमधील सहकार्य पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत, असे झैदी या वेळी म्हणाले. ऑस्ट्रेलियातील मतदान पद्धती आदर्श असल्याने भारतास तिचे अनुकरण करण्यास बराच वाव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पहिल्या महिला गिर्यारोहक

जगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्‍पा यांनी तब्बल सात वेळा यशस्वीपणे पादाक्रांत केले. हा विक्रम करणाऱ्या त्या पहिल्या महिला गिर्यारोहक आहेत. एव्हरेस्ट शिखराची उंची 8 हजार 850 मीटर असून हे शिखर तिबेटच्या सीमारेषेवरून त्यांनी पार केले. हे शिखर सातव्यांदा सर करून त्यांनी स्वत:चेच जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

गुरूच्या कक्षेत नासाचे अंतराळयान

मियामी - सौरमालेतील सर्वांत मोठा ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरूचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने प्रक्षेपित केलेले "जुनो‘ हे अंतराळयान आज गुरू ग्रहाच्या कक्षेमध्ये पोचले आहे. "नासा‘च्या संशोधकांचे हे मोठे यश गुगलच्या सर्च इंजिनने एक खास डुडल तयार करून साजरे केले. नासाच्या "कॅलिफोर्नियातील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी‘ या संस्थेमधील जेट "प्रॉपल्शन लॅबरॉटरी‘ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार "जुनो‘ने मागील पाच वर्षांत 1.7 अब्ज किलोमीटरचा प्रवास करून गुरू ग्रहाच्या कक्षेमध्ये प्रवेश केला आहे. अवकाशातील गुरू ग्रह म्हणजे नैसर्गिक वायूचा गोळा होय, त्याचे आकारमान पृथ्वीपेक्षा तीनशे पटीने अधिक आहे. या ग्रहावरील तीव्र किरणोत्सारी भागाचा अभ्यास करणे हा या अंतराळयानाचा मुख्य उद्देश आहे. हे अंतराळयान गुरूच्या पृष्ठभागाची छायाचित्रे टिपण्याबरोबर या ग्रहाची माहितीदेखील संकलित करेल, यामुळे सौरमालेचा इतिहास समजण्यास मदत होईल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. गॅलिलिओनंतर गुरूच्या कक्षेमध्ये पोचलेले जुनो हे दुसरे अंतराळयान आहे.

भारतीय संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर रवाना

मुंबई - विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडिजच्या कसोटी मालिकेसाठी मंगळवारी रात्री वेस्टइंडिजला रवाना झाला. भारतीय संघ प्रथमच प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे.
भारतीय संघ या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिला कसोटी सामना 21 ते 25 जुलैदरम्यान अँटिग्वा येथील व्हिव्हियन रिचर्डस मैदानावर खेळविला जाणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटी जमैकामध्ये (30 जुलै ते 3 ऑगस्ट), तिसरी कसोटी सेंट ल्युसियामध्ये (9 ते 13 ऑगस्ट) आणि चौथी कसोटी पोर्ट ऑफ स्पेन येथे (18 ते 22 ऑगस्ट) खेळविली जाणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघ वेस्टइंडीज क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षीय संघाविरुद्ध दोन तीन दिवसीय सराव सामने खेळणार आहे

येमेनमध्ये हदशतवादी हल्ला;सहा सैनिक ठार

एडन - दक्षिण येमेनमधील अत्यंत महत्त्वपूर्ण शहर असलेल्या एडनमध्ये आज (बुधवार) घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान सहा येमेनी सैनिक ठार झाले.
एडन आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक असलेल्या खोर मस्कार जिल्ह्यामधील सैन्याच्या तळाच्या भागामध्ये दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेली दोन वाहने घुसवून हा हल्ला घडविला. या हल्ल्यानंतर येथे सैन्य व दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री सुरु झाली असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. सैन्याकडून येथील तळाची नाकेबंदी करण्यात आली असून घटनास्थळी जादा कुमक धाडण्यात येत आहे.

इराणींना हटविण्याचा निर्णय चांगला - कॉंग्रेस

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मनुष्यबळ विकास मंत्रीपदावरून हटविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चांगला असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना कॉंग्रेस नेते पी. एल. पुनिया म्हणाले, "स्मृती इराणी यांच्या कामाबाबत कोणीही समाधानी नव्हते. त्या मंत्रिपदावर असताना रोहित वेमुला प्रकरण, जेएनयु प्रकरण घडले. मला असे वाटते की त्या मनुष्यबळ विकास विभागासाठी योग्य नव्हत्या. त्यांना हटविण्यात आले आहे आणि ती चांगली गोष्ट आहे‘ तसेच "सर्व मंत्री हे प्रचारकासारखे काम करत आहेत. मंत्र्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली का केली जाते? विभाग बदलण्यापेक्षा मंत्र्याला हटविणे हा मोठा बदल असू शकेल. मात्र तोपर्यंत विभाग बदलण्याला काहीही अर्थ नाही‘ असेही पुनिया पुढे म्हणाले

रिलायन्सची ४ जी सेवा, अवघ्या ९३ रुपयांत १० जीबी डेटा !

दि. २८ - रिलायन्स कम्युनिकेशन आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर घेऊन येत आहे.
रिलायन्स जिओ नेटवर्कची ४ जी सेवा वापरणा-या रिलायन्सच्या सीडीएमए ग्राहकांना या सेवेचा फायदा होणार आहे. अवघ्या ९३ रुपयांत १० जीबी इंटरनेट डेटा रिलायन्सच्या ग्राहकांना आता वापरता येणार आहे. ही सेवा येत्या आठवड्यापासून ठराविक सर्कलमध्ये सुरु करण्यात येणार आहे.

ईपीएफचा आणखी पैसा ईटीएफमध्ये

नवी दिल्ली : ईटीएफद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत नफा होत आहे. त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ईटीएफद्वारे शेअर बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. याबाबत ७ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय होऊ शकतो. केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी ही माहिती दिली.
कामकाजाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षेशी निगडित मुद्यावरील एका कार्यक्रमात बोलताना दत्तात्रय यांनी ही माहिती दिली. ईटीएफमध्ये ईपीएफओच्या गुंतवणुकीवर एक अहवाल केंद्रीय न्यासी बोर्डाच्या (सीबीटी) समोर मांडण्यात येणार आहे. हा अहवाल चांगला आहे. त्यामुळे आम्ही गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्याचा विचार करू. त्यामुळे त्यात गुंतवणुकीचे प्रमाणही वाढेल, असे बंडारू दत्तात्रय म्हणाले.

आॅस्ट्रेलियन कंपनी मुंबईत

मेलबर्न : मुंबईत किरकोळ आणि आतिथ्य विकास प्रकल्प विकसित करण्यासाठी आॅस्ट्रेलियातील एका प्रमुख बांधकाम कंपनीने भारतीय कंपनीसोबत १६९.५ दशलक्ष डॉलरचा करार केला आहे.

धक्क्यातून सावरला बाजार

मुंबई : ब्रेक्झिटच्या धक्क्यातून सावरलेला सेन्सेक्स मंगळवारी वाढीसह बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही वाढ मिळविली.सेन्सेक्स १२१.५९ अंकांनी अथवा 0.४६ टक्क्याने वाढून २६,५२४.५५ अंकांवर बंद

खनिज तेल महागले!

सिंगापूर : ब्रिटनच्या युरोपीय संघामधून बाहेर पडण्याच्या निर्णयानंतर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँकांनी उपाय योजना करण्याचा निर्वाळा दिला आहे. याचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किमतींत शुक्रवारी वाढ झाली. अमेरिकी बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे दर ३४ सेंटांनी अथवा 0.७0 टक्क्यांनी वाढूनन ४८.६७ डॉलर प्रति बॅरल झाले. ब्रेंट क्रूड तेलाचे भाव ३९ सेंटांनी अथवा 0.७८ टक्क्यांनी वाढून ५0.१0 डॉलर प्रति बॅरल झाले.

गोव्यात काजू उत्पादन वाढविण्यासाठी जैविक खताचा वापर

पणजी : गोव्यातील काजू उत्पादन स्थिर असल्यामुळे राज्य सरकारने उत्पादन वाढविण्यासाठी आता जैविक खताचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना जैविक खते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
राज्याचे कृषी संचालक उल्हास पई काकोड यांनी सांगितले की, यंदा काजू उत्पादक वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. आम्ही शेतकऱ्यांना सबसिडीवर जैविक खत उपलब्ध करून देणार आहोत. उत्पादन वाढविण्यातही त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. राज्यात ५५ हजार हेक्टरवर काजूची शेती आहे.

आयटीतील लाखो होतील बेरोजगार !

नवी दिल्ली : स्वयंचलित उपकरणांचे चलन वाढत चालल्यामुळे २0२१ सालापर्यंत आयटी क्षेत्रातील ६.४ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे तुलनेने कमी कुशल असणाऱ्या लोकांनाच नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या ‘कुशल भारत’ मोहिमेला यामुळे धक्का लागणार आहे.एचएसएफ रिसर्च या

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लड विजयी

रोसबो : येथे खेळल्या टी 20 क्रिकेट सामन्यात इंग्लडने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकात सर्वबाद १४० धावा करून यजमान संघापुढ़े १४१ धावांचे आव्हान ठेवले होते. विजयी लक्ष्य इंग्लंडने १७.३ षटकात २ गडी गमावून गाठले. जोस बटलरने ३४ चेंडुत अर्धशतक फटकावले. यामध्ये त्याचे २ चौकार व ३ षटकार होते. बटलर ७३ धावावर तर कर्णधार मॉरगन ४७ धावावर नाबाद राहिला.

नासाच्या 'जुनो' अवकाश यानाचा गुरुच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

पासाडेना, दि. ५ -  नासाच्या मानवरहीत 'जुनो' अवकाश यानाने सोमवारी यशस्वीरित्या गुरु ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला. या यानाने गुरु ग्रहाभोवती भ्रमण सुरु करुन आपले काम सुरु केले आहे. गुरु ग्रह आणि सुर्य मालेतील रहस्य जाणून घेण्यासाठी नासाने ही मोहिम आखली आहे.  एकूण १.१ अब्ज डॉलर खर्चाची ही मोहिम आहे. पाचवर्षांपूर्वी पाच ऑगस्ट २०११ रोजी फ्लोरिडाच्या केप कानार्वेल तळावरुन जुनो अवकाश यानाने गुरु ग्रहाच्या दिशेने उड्डाण केले होते. जुनोने एकूण २.७ अब्ज किलोमीटरचा प्रवास केला. जुनोने कक्षेत प्रवेश केल्याचा सिग्नल मिळताच नासाच्या नियंत्रण कक्षात उपस्थित शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला.  गुरुच्या कक्षेत प्रवेश करताना जुनो यानातील इंजिन प्रज्वलित झाले आणि वेग कमी झाला. गुरु आणि पृथ्वीमधील अंतरामुळे काही मिनिटांच्या अंतराने नियंत्रण कक्षाला सिग्नल मिळत होते. कक्षेत प्रवेश करताना यानाची स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होती.

ब्रेक्झिट जगाच्या हिताचे नाही

न्यूयॉर्क : ब्रेक्झिट जगाच्या हिताचे नाही, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाच्या (एसबीआय) अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी केले आहे. ब्रेक्झिटनंतर भारताला युरोप आणि ब्रिटन यांच्यासोबतच्या व्यापाराबाबत फेरतपासणी आणि फेरचर्चा करावी लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Tuesday 5 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-05-07-2016-www.KICAonline.com-english

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-05-07-2016-www.KICAonline.com-english

Ponda: Rajmata Umadevi Soundekar Wadiyar of the erstwhile Soundekar dynasty in Goa passed away on Monday following a brief illness.She was 66 and passed away in a private hospital at Belagavi, Karnataka.She was the wife of the 13 th generation king of Soundekar dynasty, late Sadashiva Basavalinga Soundekar Wadiyar. After the death of King Sadashiva in 2006 and her elder son

Friday 1 July 2016

अँड्रॉइडचे पुढचे व्हर्जन ‘नौगाट’

सॅन फ्रॅन्सिस्को : गुगलच्या पुढील अँड्रॉईड व्हर्जनचे नाव ‘नौगाट’ असे ठेवण्यात आले आहे. नौगाट ही युरोपमधील प्रसिद्ध मिठाई असते. भारतातून नाखटाई आणि नय्यापम या मिठाईंची नावे ही या स्पर्धेत होती. पण गुगलने ‘नौगाट’ला पसंती दिली. सिलिकॉन व्हॅली येथे गुगलच्या ऑफीसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हे नामकरण करण्यात आले आहे. मे महिन्यात गुगलने अँड्रॉईड व्हर्जनसाठी नाव सुचवण्याचे आवाहन केले होते. त्याला जगभरातून प्रसिद्ध मिळाला होता.भारतातून नानखटाई आणि नय्यापम या दोन मिठाईंची नावे सुचवली

लघु उद्योगांसाठी डिजिटल बँकिंग

मुंबई: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने गुरुवारी लघु व मध्यम उद्योगांसाठी (एसएमई) डिजिटल बँकिंग येथे सुरू केले. यामुळे एसएमई क्षेत्रातील उद्योजकांना लागणाऱ्या सर्व सेवा ऑनलाइन व अहोरात्र उपलब्ध होणार

प्रेमनारायण ‘आयएमसी’चे नवीन अध्यक्ष

१०८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रेमनारायण अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला इंडियन र्मचट्स चेंबरचे (आयएमसी) नवे अध्यक्ष म्हणून दीपक प्रेमनारायण यांची निवड करण्यात आली आहे. चेंबरच्या मंगळवारी झालेल्या १०८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रेमनारायण अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. २०१६-१७ या

रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन. एस. विश्वनाथन

रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून एन. एस. विश्वनाथन यांची नियुक्ती - रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून एन. एस. विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे एक डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान येत्या ३ जुलै रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर विश्वनाथन यांना बढती देण्यात आली आहे. विश्वनाथन रिझव्‍‌र्ह बँकेत एप्रिल २०१४ पासून कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्याकडे आता वित्तीय बाजारपेठ, अंतर्गत रोखे

उद्योगातून स्वागत................

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे उद्योग जगताने स्वागत केले आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे उद्योग जगताने स्वागत केले आहे. वाढत्या वेतनामुळे ग्राहकांचा खर्च करण्याचा कल आगामी कालावधीत वाढण्याची शक्यता असून दैनंदिन जीवनात आवश्यक गरजांवर तो होईल, असे नमूद करण्यात आले आहे. मारुती सुझुकीने याबाबत म्हटले आहे की, केंद्र सरकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांमुळे आम्ही चालू वर्षांत २५ टक्के वाहन विक्रीतील वाढ अपेक्षित करत आहोत. आमच्या एकूण वाहन विक्रीमध्ये केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचारी हे ग्राहक म्हणून असण्याचे प्रमाण तब्बल १७ टक्के असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. शॉपर्स स्टॉपचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सांगितले की, किरकोळ विक्री क्षेत्राला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यास अहोरात्र दुकाने, मॉल तसेच सिनेमागृह चालू ठेवण्यास मिळणारी परवानगी कारणीभूत ठरेल. यामुळे ‘परवानगी राज’ संपुष्टात येणार असून ही व्यवस्था अधिक सुलभ व्हावी. विविध राज्येही या प्रस्तावाला पूरक निर्णय घेतील, अशी आशा त्यांनी व्यक्त

भारतीयांच्या काळ्या पैशाचा ‘स्विस’ ओघ आटला!

भारतीयांकडून स्विस बँकांतील ओघाला आहोटी लागली असून २०१५ अखेर ती १.२ अब्ज फ्रँक भारतीयांकडून स्विस बँकांतील ओघाला आहोटी लागली असून २०१५ अखेर ती १.२ अब्ज फ्रँक अशा विक्रमी तळात पोहोचली आहे. याबाबत पाकिस्तानने भारताला मागे टाकले असून विदेशातील त्यांचा पैसा १.५ अब्ज फ्रँकपर्यंत पोहोचला आहे. स्वित्र्झलँडची मध्यवर्ती बँक असलेल्या स्विस नॅशनल बँकने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार