Saturday, 9 July 2016

.भारत-दक्षिण आफ्रिकेदरम्यान करार

संरक्षण, व्यापार, उत्पादन, खाण आणि खनिज आदी क्षेत्रात भागीदारी करण्याबाबत भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जॅकब झुमा यांनी या करारांवर स्वाक्षरी केली. महात्मा  गांधीजी यांनी दक्षिण आफ्रिकेत दिलेल्या वंशभेदविरोधी लढ्याला उजाळा देत उभय नेत्यांनी दोन्ही देशांतील संबंध वृद्धिंगत करण्याचा निर्धार केला.पंतप्रधान मोदी आफ्रिकन देशांच्या दौर्‍यावर आहेत. मोदी यांनी शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेला भेट दिली. राष्ट्राध्यक्ष झुमा यांनी मोदी यांचे स्वागत केले. दहशतवादी कारवायांनी लोकांचे जीवन धोक्यात आल्याने दहशतवादविरोधी लढ्यात एकत्रित काम करण्याचा निर्धारही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.  संरक्षण, सागरी सुरक्षा, खाण, खनिज क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी करण्यात आली. 

No comments:

Post a Comment