Saturday, 9 July 2016

फेडेक्स पराभूत

जागतिक रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या नोव्हाक जोकोविचने झटपट गाशा गुंडाळल्याने रॉजर फेडररला यंदा विम्बल्डन जेतेपदाची संधी आहे, असे म्हणणाऱ्या त्याच्या पाठिराख्यांचा हिरमोड झाला आहे. शुक्रवारी ऑल इंग्लंड क्लबवरील सेंटर कोर्टवर पार पडलेल्या उपांत्य झुंजीत कॅनडाच्या मिलॉस रावनिकने स्वित्झर्लंडच्या माजी विजेत्या रॉजर फेडररवर ६-३, ६-७ (३-७), ४-६, ७-५, ६-३ असा विजय मिळवून विम्बल्डनच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तब्बल तीन तास २५ मिनिटे रंगलेल्या या लढतीत ३४ वर्षांच्या फेडररने २५ वर्षांच्या मिलॉस रावनिकला कडवी झुंज दिली हे विशेष; पण रावनिकची ताकद काही अंशी सरस ठरली आणि फेडरर मागे पडला.

No comments:

Post a Comment