आपले लष्करी सामर्थ्य वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनने ‘वाय-२०’ नावाच्या विमानाची निर्मिती केली असून हे विमान चीनच्या वायू दलात बुधवारी सहभागी झाले आहे. लष्करी वाहतुकीसाठी या विमानाचा वापर केला जाणार असून जगातील अशा प्रकारचे लष्करी वाहतुकीसाठीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान असल्याचे सांगितले जात आहे. या विमानाचे टेक ऑफ वजन क्षमता ही तब्बल २०० टन इतके आहे. २०० टन वजनासह ४,५०० किलोमीटर इतका प्रवास हे विमान करू शकते. तर वजन जर ४० टन कमी केले तर हे विमान ८००० किलोमीटर इतका प्रवास करू शकते. लष्कर जगात आज सर्वात मोठे लष्कर समजले जाते. इतक्या मोठ्या लष्कराच्या दळवळणासाठी हवाई दलात वापरायची विमाने ही मोठी असणे चीनसाठी आवश्यक असल्याने या विमानाची निर्मिती केली जात आहे.
Saturday, 9 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment