भारतीयांकडून स्विस बँकांतील ओघाला आहोटी लागली असून २०१५ अखेर ती १.२ अब्ज फ्रँक भारतीयांकडून स्विस बँकांतील ओघाला आहोटी लागली असून २०१५ अखेर ती १.२ अब्ज फ्रँक अशा विक्रमी तळात पोहोचली आहे. याबाबत पाकिस्तानने भारताला मागे टाकले असून विदेशातील त्यांचा पैसा १.५ अब्ज फ्रँकपर्यंत पोहोचला आहे. स्वित्र्झलँडची मध्यवर्ती बँक असलेल्या स्विस नॅशनल बँकने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार
, स्विस बँकेतील भारतीयांची रक्कम ५९.६४ कोटी फ्रँकने कमी होत ती १.२ अब्ज फँ्रकपर्यंत घसरली आहे. भारतीय चलनात ही रक्कम ८,३९२ कोटी रुपये आहे. या खात्यांसंदर्भात गोपनीयता संपुष्टात येऊन, स्वित्र्झलँडमध्ये ही माहिती खुली करण्याच्या केलेल्या सुधारणेमुळे गेल्या दोन वर्षांत स्विस बँकांतील भारतीयांचा ओघ कमी झाला आहे. यापूर्वी २००६ मध्ये भारतीयांचे सर्वाधिक, २३,००० कोटी रुपये स्विस बँकेत होते. २०११ व २०१३ वगळता इतर वर्षांमध्ये त्यात घसरण नोंदली गेली आहे. या दोन्ही वर्षांत ओघ अनुक्रमे १२ व ४२ टक्के वाढला होता. काळ्या पैशाविरोधातील भारताच्या मोहिमेला स्विस बँकांकडून प्रतिसाद मिळत आहे. पाकिस्तानची स्विस बँकांतील रक्कम २०१५ मध्ये १६ टक्क्य़ांनी वाढून १०,००० कोटी रुपयांवर गेली आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानची रक्कम प्रथमच वाढली आहे. चीनचीही स्विस बँकांतील रक्कम घटली आहे.Friday, 1 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment