श्रीनगर, दि. ९ - काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करून हिजबुल मुजाहिद्दीनच्या म्होरक्यासह तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर खो-यात तणावाचे आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी बुरहान वानी हा काल रात्री जवानांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आणि फुटीरतवाद्यांनी बंद पुकारला. याच तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अमरनाथ यात्राही तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये व सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना नजरकैदेत ठेवले आहे. तसेच खो-यातील इंटनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे. ('हिजबुल'च्या कमांडरसह ३ अतिरेक्यांचा खात्मा)काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि पोलिसाच झालेल्या चकमकीत बुरहानला लष्काराने यमसदनी पाठवले आहे. दीर्घ काळ चाललेल्या या चकमकीत बुरहानसोबत तिघा दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले आहे. स्वतःचा आणि आपल्या साथीदारांचा फोटो सोशल मीडियावर टाकणारा बुरहान हा पहिला (कमांडर) दहशतवादी होता. बुरहानसोबत ज्या दहशतवाद्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यांचा वेगवेगळ्या चकमकीत मृत्यू झाला आहे. बुरहानचा खात्मा हा सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने मोठं यश मानलं जात आहे.
Saturday, 9 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment