Friday, 1 July 2016

रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन. एस. विश्वनाथन

रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून एन. एस. विश्वनाथन यांची नियुक्ती - रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून एन. एस. विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे एक डेप्युटी गव्हर्नर एच. आर. खान येत्या ३ जुलै रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर विश्वनाथन यांना बढती देण्यात आली आहे. विश्वनाथन रिझव्‍‌र्ह बँकेत एप्रिल २०१४ पासून कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्याकडे आता वित्तीय बाजारपेठ, अंतर्गत रोखे
व्यवस्थापन, विदेश व्यवस्थापन आदी जबाबदारी असेल. विश्वनाथन यांच्या नियुक्तीला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विश्वनाथन रिझव्‍‌र्ह बँकेच्या बिगरबँकिंग विभागात प्रधान मुख्य सर व्यवस्थापक होते. आयएफसीआय लिमिटेडच्या दक्षता विभागाचे मुख्य सर व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणारे विश्वनाथन पंजाब नॅशनल बँक, देना बँकेतही वरिष्ठ पदावर होते. रिझव्‍‌र्ह बँकेवर चार डेप्युटी गव्हर्नर असतात. पैकी एक अंतर्गत रिझव्‍‌र्ह बँक, एक वाणिज्यिक बँक, तर उर्वरित दोन अर्थतज्ज्ञ म्हणून नियुक्त केले जातात. रिझव्‍‌र्ह बँकेतूनच जुलै २०११ मध्ये डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्त झालेल्या खान यांना पहिल्या मुदतीनंतर पुढील दोन वर्षांकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. -

No comments:

Post a comment