Saturday, 9 July 2016

.उत्तर कोरियाची बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्र चाचणी

उत्तर कोरियाने आज पाणबुडीवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. पण, ती अयशस्वी झाल्याचा दावा दक्षिण कोरियातील अधिकाऱ्यांनी केला आहे. त्तर कोरियाने पूर्वेकडील सिनपो किनाऱ्यावर आज सकाळी 11.30 वाजता या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. उत्तर कोरियाने पाणबुडीवरून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे शेजारील राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे. उत्तर कोरिया अण्वस्त्रे बनविण्याच्या तयारीत आहे. संयुक्त राष्ट्र संघाकडून यावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान बनवण्‍यास संयुक्त राष्ट्र संघाने प्रस्‍ताव ठेवला आहे. तरीदेखील उत्तर कोरियाने नियमांची पायमल्‍ली करत क्षेपणास्‍त्र चाचणी घेतली आहे.

1 comment: