Wednesday 6 July 2016

ईपीएफचा आणखी पैसा ईटीएफमध्ये

नवी दिल्ली : ईटीएफद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत नफा होत आहे. त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ईटीएफद्वारे शेअर बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. याबाबत ७ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय होऊ शकतो. केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांनी ही माहिती दिली.
कामकाजाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षेशी निगडित मुद्यावरील एका कार्यक्रमात बोलताना दत्तात्रय यांनी ही माहिती दिली. ईटीएफमध्ये ईपीएफओच्या गुंतवणुकीवर एक अहवाल केंद्रीय न्यासी बोर्डाच्या (सीबीटी) समोर मांडण्यात येणार आहे. हा अहवाल चांगला आहे. त्यामुळे आम्ही गुंतवणुकीचे प्रमाण वाढविण्याचा विचार करू. त्यामुळे त्यात गुंतवणुकीचे प्रमाणही वाढेल, असे बंडारू दत्तात्रय म्हणाले.

७ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कामगारमंत्रीच राहतील. त्या बैठकीत गुंतवणुकीबाबत विस्तृत चर्चा होईल. एक्स्चेंज ट्रेडेड फंडाच्या (ईटीएफ) युनिटस्ना बाजारात शेअर्सप्रमाणे खरेदी केले जाऊ शकते किंवा विकले जाऊ शकते. या फंडाचा पैसा निवडक शेअर्समध्ये बॉण्डस्, वस्तू आणि सूचकांक आधारित अनुबंधात लावला जाऊ शकतो.

No comments:

Post a Comment