Saturday, 9 July 2016

उ. कोरियासाठी अमेरिकेची द. कोरियात मिसाईल

अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दोन्ही देशांना उत्तर कोरियाकडून असलेल्या हल्ल्याचा धोका लक्षात घेत अमेरिकेने दक्षिण कोरियात अत्याधुनिक मीसाईल तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती पेंटागॉनने गुरुवारी रात्री दिले आहे. या माहितीनुसार टर्मिनल हाई ऐटिट्यूड एरिया डिफेंस(थाड) मिसाईल तैनात करण्याचा निर्णय अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी एकत्रितपणे घेतला आहे. अमेरिकेने हा निर्णय या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात घेतला होता. याचे मुख्य कारण उत्तर कोरियाने घेतलेली  चौथी अण्विक चाचणी होती.  'थाड' मिसाईलचा निर्णय लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. उत्तर कोरियाला हे एका प्रकारचे चोख उत्तर असून यामुळे दोन्ही देशांच्या सुरक्षितेत वाढ होईल. 

1 comment: