Wednesday 6 July 2016

आॅस्ट्रेलियन कंपनी मुंबईत

मेलबर्न : मुंबईत किरकोळ आणि आतिथ्य विकास प्रकल्प विकसित करण्यासाठी आॅस्ट्रेलियातील एका प्रमुख बांधकाम कंपनीने भारतीय कंपनीसोबत १६९.५ दशलक्ष डॉलरचा करार केला आहे.

सीआयएमआयसी समूहातील कंपनी लेटन एशियाने आपली सहयोगी लेटन इंडिया कॉन्ट्रॅक्टर्सद्वारे मुंबईत मेकर मॅक्सिटी प्रकल्पाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी समझोता केला. हे प्रकल्प पूर्ण करण्याने लेटन एशियाला १६९.५ दशलक्ष डॉलरचे उत्पन्न होईल. प्रमुख किरकोळ आणि आतिथ्य केंद्र बनविण्याची ही योजना आहे. लेटन एशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅन्युएल अल्वारेज मुनोज म्हणाले की, मेकर समूहाशी मिळून आम्ही पहिला मोठा प्रकल्प करीत आहोत.

No comments:

Post a Comment