स्थापनेनंतर कुठल्याही सदस्य देशाने ही संघटना सोडलेली नाही. ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठी कौल दिल्यानंतर युरोप ‘अनिश्चिततेच्या काळात’ प्रवेश करत असून, १९९३ साली २८ सदस्यांच्या या राजकीय-आर्थिक गटाच्या स्थापनेनंतर हे त्याच्यासमोरील ‘सगळ्यात मोठे आव्हान’ ठरू शकते, असा इशारा सीआयए या अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी दिला आहे. स्थापनेनंतर कुठल्याही सदस्य देशाने ही संघटना
सोडलेली नाही. ब्रिटनच्या बाहेर पडण्याने निर्माण झालेल्या परिस्थितीचा ब्रिटन तसेच युरोपीय महासंघ आढावा घेत असून त्यांच्या वाटाघाटीच्या ताकदीचा अंदाज घेत असल्यामुळे युरोप अनिश्चिततेच्या काळात प्रवेश करत आहे, असे सीआयएचे प्रमुख जॉन ब्रेनन यांनी म्हटले आहे. युरोपीय महासंघाला अलीकडच्या वर्षांमध्ये ज्या संकटांचा सामना करावा लागला, त्यामध्ये ब्रिटनचे संघटनेतून बाहेर पडणे हे सगळ्यात मोठे आव्हान राहील, असे ब्रेनन म्हणाले. -Friday, 1 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment