Wednesday, 6 July 2016

इराणींना हटविण्याचा निर्णय चांगला - कॉंग्रेस

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना मनुष्यबळ विकास मंत्रीपदावरून हटविण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चांगला असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना कॉंग्रेस नेते पी. एल. पुनिया म्हणाले, "स्मृती इराणी यांच्या कामाबाबत कोणीही समाधानी नव्हते. त्या मंत्रिपदावर असताना रोहित वेमुला प्रकरण, जेएनयु प्रकरण घडले. मला असे वाटते की त्या मनुष्यबळ विकास विभागासाठी योग्य नव्हत्या. त्यांना हटविण्यात आले आहे आणि ती चांगली गोष्ट आहे‘ तसेच "सर्व मंत्री हे प्रचारकासारखे काम करत आहेत. मंत्र्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली का केली जाते? विभाग बदलण्यापेक्षा मंत्र्याला हटविणे हा मोठा बदल असू शकेल. मात्र तोपर्यंत विभाग बदलण्याला काहीही अर्थ नाही‘ असेही पुनिया पुढे म्हणाले

No comments:

Post a comment