Saturday, 9 July 2016

मंत्रिमंडळ विस्तार : शिवसेनेकडून अधिकृत दोन नावांची घोषणा

 मुंबई :  गेल्या दोन दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना सामील होणार की नाही या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन राज्यमंत्री पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.शिवसेनेने दोन राज्यमंत्रीपदावर समाधान मानले असून अर्जुन खोतकर आणि गुलाबराव पाटील यांचे नाव अधिकृतपणे जाहीर केले आहे. दरम्यान, शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार नसून दोन राज्यमंत्रीपद पदांवर भाजपने त्यांची बोळवण केल्याचे समजते. तसेच, कॅबिनेट मंत्रीपदासंदर्भात शिवसेनेने तडजोड करून एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खाते देण्यावर मान्य केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

No comments:

Post a Comment