Wednesday, 6 July 2016

आयटीतील लाखो होतील बेरोजगार !

नवी दिल्ली : स्वयंचलित उपकरणांचे चलन वाढत चालल्यामुळे २0२१ सालापर्यंत आयटी क्षेत्रातील ६.४ लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे तुलनेने कमी कुशल असणाऱ्या लोकांनाच नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या ‘कुशल भारत’ मोहिमेला यामुळे धक्का लागणार आहे.एचएसएफ रिसर्च या
संस्थेने हा अभ्यास केला आहे. अभ्यासांती जारी करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारत आणि विदेशात मिळून आयटी क्षेत्रातील ९ टक्के नोकऱ्या यंत्रे संपवून टाकणार आहेत. यंत्रांमुळे गमावल्या जाऊ शकणाऱ्या या नोकऱ्यांची एकूण संख्या १.४ दशलक्ष इतकी आहे. एचएफएसने म्हटले की, कमी कुशल रोजगारांच्या उपलब्धतेत ३0 टक्क्यांनी घट होईल. याच वेळी मध्यम कुशल रोजगारांत ८ टक्क्यांची, तर उच्च प्रमाणात कुशल रोजगारांत ५६ टक्क्यांची वाढ होईल.

No comments:

Post a comment