मुंबई: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने गुरुवारी लघु व मध्यम उद्योगांसाठी (एसएमई) डिजिटल बँकिंग येथे सुरू केले. यामुळे एसएमई क्षेत्रातील उद्योजकांना लागणाऱ्या सर्व सेवा ऑनलाइन व अहोरात्र उपलब्ध होणार
असल्याचे बँकेच्या व्यवसाय बँकिंग विभागाचे प्रमुख असीम ध्रु यांनी सांगितले. एसएमईंना आयात-निर्यातीसाठी बँकांची मदत लागते. पतपुरवठा व पतहमीसाठी लेटर ऑफ क्रेडिट आवश्यक असते, याशिवाय धनादेशाशिवाय पैशांची देवाणघेवाण, बँक हमी, परकी चलन व्यवहार आदींसाठीही एसएमई बँकिंग सेवा उपयुक्त ठरणार आहे. बँकेच्या एकूण व्यवहारांपैकी ६० टक्के व्यवहार ऑनलाइन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच एक लाख एसएमईंपर्यंत ही सेवा नेण्याचे लक्ष्य असल्याचे ध्रु म्हणाले.Friday, 1 July 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment