Saturday 9 July 2016

भारताची आजपासून पूर्वपरीक्षा

भारताचे नूतन प्रशिक्षक अनिल कुंबळे सध्या तेज गोलंदाज मोहम्मद शमी आणि सलामीवीर शिक्षर धवन यांच्यावर कटाक्ष ठेवून आहेत. आज, शनिवारपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाच्या सराव सामन्याला सुरुवात होत असून शमीचा फिटनेस आणि शिखर धवनचा सूर यावर कुंबळेचे खास लक्ष असेल.वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षिय संघासह भारत दोन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. या
सामन्यात एकेक दिवस प्रत्येक संघाला फलंदाजी करण्याची संधी मिळेल, तसेच उभय संघांमधील प्रत्येक फलंदाजाला फलंदाजीची संधी देण्यात येणार आहे. ४९ दिवसांच्या हा दौरा म्हणजे कुंबळेची प्रशिक्षक म्हणून नवी इनिंग असेल. शमीचा फिटनेस कसा आहे, तो पुनरागमनासाठी सज्ज आहे की नाही या गोष्टींची पडताळणी भारतीय संघव्यवस्थापन या सराव सामन्यातून करेल. खासकरून सामन्यातील दुसरा व तिसरा स्पेल तो कसा टाकणार आहे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. अलीकडेच भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने शमीला शाबास्की देत 'तो कसोटी सामन्यांसाठी आदर्श गोलंदाज आहे', अशी तारीफ केली होती. आपल्या कर्णधाराचा शब्द शमी खरा करतो की नाही, ते येणाऱ्या सामन्यांमधून कळेलच.शमीसह इशांत शर्माही बऱ्याच दिवसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे, त्यामुळे त्याच्यावरही कुंबळे लक्ष ठेवून असेल. यासह उमेश यादव याच्यावरही कोहली विश्वास टाकण्याची शक्यता आहे. शमी, इशांत, उमेश हे कर्णधार कोहलीच्या 'गेम प्लान'मधील महत्त्वाचे गोलंदाज ठरण्याची शक्यता आहे. रिव्हर्स स्विंगमध्ये पटाईत असलेला भुवनेश्वकुमार आणि शार्दुल ठाकूर यांचाही पर्याय कोहलीच्या समोर असेलच.

1 comment:

  1. It's very nice and knowledgeable post sir.
    SarkariNaukriFinder is a Job portal to find Top Sarkari Jobs for Railway, Banking and Public Sectors. Sarkari Naukri 2020, Government Job 2020.

    ReplyDelete