Saturday, 9 July 2016

टीम इंडियाच्या ‘कसोटी’चा काळ

वर्षभरात होणाऱ्या १७ कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जय्यत तयारी सुरू असून कर्णधार विराट कोहलीने आगामी काळ हा भारतीय क्रिकेट संघाच्या जडणघडणीचा काळ असल्याचे म्हटले आहे. हा काळ भारतीय खेळाडू एक कसोटी संघ म्हणून कसे वाटचाल करतात याचा निदर्शक असेल, असे कोहलीला वाटते. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने आपल्या आगामी आव्हानांबद्दल टिप्पणी केली.अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी झालेल्या निवडीचेही
कोहलीने स्वागत केले. तो म्हणाला की, अनिलभाईंची निवड आमचे प्रशिक्षक म्हणून झाली, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. विशेषतः त्यांच्या उपस्थितीमुळे संघातील गोलंदाजांना हुरूप आला आहे. अनिल कुंबळे यांनी भारताला अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे भारतात किंवा परदेशात सामने जिंकण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टींची गरज आहे, हे ते चांगलेच जाणून आहेत.कुंबळे यांनी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काही बदल केले आहेत. त्यानुसार ड्रम वाजविण्याचे एक सत्र नुकतेच झाले आणि त्यात सर्वांनीच धमाल केली. आमच्यासाठी ते आश्चर्यच होते. भरगच्च क्रिकेट दौऱ्यात आम्ही संघ म्हणून एकत्र येण्याचा विचारच मागे सोडून दिला होता. अशा धमाल सत्रामुळे आमच्यात एकोपा होण्यास मदत झाली. धोनीभाईही आमच्यात सामील झाले आणि त्यांनीही धमाल उडवून दिली.सध्या यष्टीरक्षक म्हणून के. एल. राहुलही संघात आहे शिवाय, वृद्धिमान साहाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पण कोहलीने यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमानलाच प्रथम प्राधान्य दिले जाईल यावर शिक्कामोर्तब केले

No comments:

Post a Comment