सॅन फ्रॅन्सिस्को : गुगलच्या पुढील अँड्रॉईड व्हर्जनचे नाव ‘नौगाट’ असे ठेवण्यात आले आहे. नौगाट ही युरोपमधील प्रसिद्ध मिठाई असते. भारतातून नाखटाई आणि नय्यापम या मिठाईंची नावे ही या स्पर्धेत होती. पण गुगलने ‘नौगाट’ला पसंती दिली. सिलिकॉन व्हॅली येथे गुगलच्या ऑफीसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हे नामकरण करण्यात आले आहे. मे महिन्यात गुगलने अँड्रॉईड व्हर्जनसाठी नाव सुचवण्याचे आवाहन केले होते. त्याला जगभरातून प्रसिद्ध मिळाला होता.भारतातून नानखटाई आणि नय्यापम या दोन मिठाईंची नावे सुचवली
गेली होती. नौगाट ही मिठाई मध, दूध आणि ड्रायफ्रुटसपासून बनवली जाते.
गुगलने ट्विटरवरही माहिती जाहीर केली असून भल्यामोठ्या नौगाटवर उभा असलेल्या अँड्रॉईड पुतळ्याचा व्हीडीओ शेअर करण्यात आला आहे. जगभरातील १.१६ अब्ज मोबाईल गुगलच्या अँड्रॉईडवर चालतात. मार्केट शेअरचा विचार केला तर हा हिस्सा ८२ टक्के इतका आहे. अँड्रॉईडचे आतापर्यंत कपकेक, डोनट, इक्लेअर, फ्रोयो, जिंजरब्रिड, हनीकोंब, आईसक्रीम सँडवीच, जेलीबिन, किटकॅट, मार्शमॅलो असे व्हर्जन आले आहेत.
No comments:
Post a Comment