जागतिक रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या नोव्हाक जोकोविचने झटपट गाशा गुंडाळल्याने रॉजर फेडररला यंदा विम्बल्डन जेतेपदाची संधी आहे, असे म्हणणाऱ्या त्याच्या पाठिराख्यांचा हिरमोड झाला आहे. शुक्रवारी ऑल इंग्लंड क्लबवरील सेंटर कोर्टवर पार पडलेल्या उपांत्य झुंजीत कॅनडाच्या मिलॉस रावनिकने स्वित्झर्लंडच्या माजी विजेत्या रॉजर फेडररवर ६-३, ६-७ (३-७), ४-६, ७-५, ६-३ असा विजय मिळवून विम्बल्डनच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तब्बल तीन तास २५ मिनिटे रंगलेल्या या लढतीत ३४ वर्षांच्या फेडररने २५ वर्षांच्या मिलॉस रावनिकला कडवी झुंज दिली हे विशेष; पण रावनिकची ताकद काही अंशी सरस ठरली आणि फेडरर मागे पडला.
Showing posts with label National sports news. Show all posts
Showing posts with label National sports news. Show all posts
Saturday, 9 July 2016
Saturday, 25 June 2016
हरमनप्रीत खेळणार बिग बॅश लीगमध्ये
धर्मशाला : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर यावर्षी डिसेंबर महिन्यात आॅस्ट्रेलियात होणाऱ्या महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) ट्वेंटी-२0 स्पर्धेत सिडनी थंडर्स संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेत खेळणारी ती पहिली महिला भारतीय क्रिकेटर आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी येथे बोर्डाच्या बैठकीच्या अखेरच्या दिवशी हरमनप्रीतने सिडनी
Subscribe to:
Posts (Atom)