लंडन, दि.८ - विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील दुसऱ्या उपांत्य फेरीत ग्रेट ब्रिटनच्या द्वितीय मानांकित अँडी मरे याने झेक रिपब्लिकच्या दहाव्या मानांकित टॉमस बेर्डिच याचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटसमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठली.अँडी मरे याने हा सामना १ तास ५७ मिनिटांत जिंकला. आता त्याची विजेतेपदाच्या लढतीसाठी कॅनडाच्या मिलोस राओनिक याच्याशी गाठ पडेल.
Showing posts with label sports news. Show all posts
Showing posts with label sports news. Show all posts
Saturday, 9 July 2016
मुम्बा अव्वल क्रमांकावर
अनुभव आणि कौशल्यपूर्ण खेळ या जोरावर सामना एकहाती खेचून आणण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, हे अनुपकुमारने शुक्रवारीदेखील दाखवून दिले. रिशांक देवाडिगासारखा चढाईपटू व जीवाकुमारसारखा बचावातील मोहरा अपयशी ठरूनही यू मुम्बाने शुक्रवारी प्रो कबड्डी लीगमधील झुंजीत पिछाडी भरून काढत बेंगळुरू बुल्सवर २४-२३ असा निसटता विजय मिळवला. यू मुम्बाने या विजयासह अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे.
टीम इंडियाच्या ‘कसोटी’चा काळ
वर्षभरात होणाऱ्या १७ कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जय्यत तयारी सुरू असून कर्णधार विराट कोहलीने आगामी काळ हा भारतीय क्रिकेट संघाच्या जडणघडणीचा काळ असल्याचे म्हटले आहे. हा काळ भारतीय खेळाडू एक कसोटी संघ म्हणून कसे वाटचाल करतात याचा निदर्शक असेल, असे कोहलीला वाटते. भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने आपल्या आगामी आव्हानांबद्दल टिप्पणी केली.अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी झालेल्या निवडीचेही
परदेशी क्रिकेट संघांची बांगलादेशवर फुली
बांगलादेशची राजधानी ढाक्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानप्रमाणेच परदेशी संघ क्रिकेट खेळण्यासाठी बांगलादेशात जाण्यास नकार देतील, अशी भीती आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे (आयसीसी) माजी अध्यक्ष एहसान मानी यांनी व्यक्त केली आहे.ढाक्यात दहशतवाद्यांनी २० परदेशी नागरिकांना ठार मारल्यामुळे भविष्यात परदेशी क्रिकेट संघ बांगलादेशात खेळण्यास पाकिस्तानप्रमाणेच नकार देतील अशी शक्यता मानी यांनी व्यक्त केली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये इंग्लंडचा संघ बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर या दहशतवादी घटनेचे सावट असेल.मानी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, ढाक्यात घडलेल्या या घटनेनंतर पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशलाही परदेशी क्रिकेट संघांचे मन वळविण्यात अडचणी येणार आहेत. गेल्या काही वर्षांत बांगलादेशातील दहशतवादी घटनांमुळे बांगलादेश क्रिकेटला मोठा धक्का बसू शकेल. एकूणच आगामी दौऱ्यासाठी इंग्लिश संघाचे मन वळविणे बांगलादेशला सोपे जाणार नाही.मानी म्हणाले की, बांगलादेशातील दहशतवादी घटनेनंतरही जर बांगलादेश क्रिकेट बोर्ड परदेशी क्रिकेट संघांनी तेथे खेळावे म्हणून त्यांचे मन वळविण्यात यशस्वी ठरले तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल. कारण २००९मध्ये श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान परदेशी क्रिकेट संघांचे मन वळविण्यात यशस्वी ठरलेले नाही.
भारताची आजपासून पूर्वपरीक्षा
भारताचे नूतन प्रशिक्षक अनिल कुंबळे सध्या तेज गोलंदाज मोहम्मद शमी आणि सलामीवीर शिक्षर धवन यांच्यावर कटाक्ष ठेवून आहेत. आज, शनिवारपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाच्या सराव सामन्याला सुरुवात होत असून शमीचा फिटनेस आणि शिखर धवनचा सूर यावर कुंबळेचे खास लक्ष असेल.वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षिय संघासह भारत दोन दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. या
Friday, 8 July 2016
युरो चषक - फ्रान्स अंतिम फेरीत
मार्सेले : युरो चषक २0१६ फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ग्रिजमनने नोंदवलेल्या दोन गोलच्या जोरावर फ्रान्सने जगज्जेत्या जर्मनीला २-0 गोलने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. २000 नंतर पहिल्यांदाच फ्रान्स युरो चषकाच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. सुरवातीची दहा मिनिटे यजमान फ्रान्सने दबदबा निर्माण केला, परंतु त्यानंतर रंगात आलेल्या जर्मनीने फ्रान्सच्या गोलपोस्टवर धडाधड आक्रमणे केली. चेंडू सतत फ्रान्सच्या गोलक्षेत्रात फिरत होता. सामन्यात चेंडूचे पझेशन जर्मनीकडे ६५ टक्के तर फ्रान्सकडे ३५ टक्के इतके होते. सामन्यात वर्चस्व जर्मनीचे असले तरी पुर्वार्ध संपता संपता फ्रान्सचे नशीब फळफळले. ग्रिजमनच्या कॉर्नरला हेडद्वारे ब्लॉक करताना जर्मनीचा कर्णधार श्वाईनटायगरचा हात चेंडूला लागला आणि पंचांनी फ्रान्सला पेनाल्टी बहाल केली. ग्रिजमनने या पेनाल्टीचे सोने केले. त्याने चेंडूला उजव्या कोपऱ्यातून गोलजाळीत धाडून फ्रान्सला १-0 असे आघाडीवर नेले.उत्तरार्धात खेळ संथ होत आहे असे वाटत असतानाच पोग्बाच्या ग्रिजमनने ७२ व्या मिनिटाला दुसरा गोल नोंदवला. मैदानाच्या डाव्या कोपऱ्यात पोग्बाने पदलालित्याचा उत्कृष्ट नमुना दाखवत जर्मन खेळाडूला झुलवत गोलपोस्टच्या दिशेन फटका खेळला. हा चेंडू जर्मन गोलकिपर नेयुरने मोठ्या शिताफीने परतवला खरा, पण पुढे उभ्या असलेल्या ग्रिजमनने सहजपणे त्याला गोलजाळीची दिशा दाखवली. २-0 अशी आघाडी मिळाल्यामुळे स्टेडीयममध्ये उपस्थित यजमान संघाच्या चाहत्यांमध्ये उत्साह पसरला तर खेळाडूंमध्ये चैतन्य संचारले.पिछाडीवर पडलेल्या जर्मन संघाने यानंतर आक्रमणाचा जोर वाढवला. मुलर, ओझील, गोत्झे यांनी अनेक चढाया केल्या, परंतु त्यांना गोल नोंदवण्यात अपयश आले. फ्रान्सचा गोलरक्षक हुगो लोरिसने चपळाईने ही आक्रमणे परतावून लावली. शेवटी ही लढत २-0 अशी जिंकून फ्रान्सने अंतिम फेरी गाठली.
Wednesday, 6 July 2016
भारतीय संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर रवाना
मुंबई
- विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडिजच्या कसोटी
मालिकेसाठी मंगळवारी रात्री वेस्टइंडिजला रवाना झाला. भारतीय संघ प्रथमच
प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे.
भारतीय
संघ या दौऱ्यात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिला
कसोटी सामना 21 ते 25 जुलैदरम्यान अँटिग्वा येथील व्हिव्हियन रिचर्डस
मैदानावर खेळविला जाणार आहे. त्यानंतर दुसरी कसोटी जमैकामध्ये (30 जुलै ते 3
ऑगस्ट), तिसरी कसोटी सेंट ल्युसियामध्ये (9 ते 13 ऑगस्ट) आणि चौथी कसोटी
पोर्ट ऑफ स्पेन येथे (18 ते 22 ऑगस्ट) खेळविली जाणार आहे. त्यापूर्वी
भारतीय संघ वेस्टइंडीज क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षीय संघाविरुद्ध दोन तीन
दिवसीय सराव सामने खेळणार आहे
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लड विजयी
रोसबो : येथे खेळल्या टी 20 क्रिकेट सामन्यात इंग्लडने श्रीलंकेचा ८ गडी
राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकात सर्वबाद १४०
धावा करून यजमान संघापुढ़े १४१ धावांचे आव्हान ठेवले होते. विजयी लक्ष्य
इंग्लंडने १७.३ षटकात २ गडी गमावून गाठले. जोस बटलरने ३४ चेंडुत अर्धशतक
फटकावले. यामध्ये त्याचे २ चौकार व ३ षटकार होते. बटलर ७३ धावावर तर
कर्णधार मॉरगन ४७ धावावर नाबाद राहिला.
Subscribe to:
Posts (Atom)